अंधेरी पोलिस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:22 IST2017-08-17T20:19:43+5:302017-08-17T20:22:55+5:30

मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यामध्ये एका आरोपीने  गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी हा प्रकार घडला असून, आरोपीने बनियनच्या  मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Suicides by the accused in Andheri police station | अंधेरी पोलिस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

अंधेरी पोलिस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई, दि. 17 - मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यामध्ये एका आरोपीने  गळफास घेऊन आत्महत्या केली.  आज दुपारी हा प्रकार घडला असून, आरोपीने बनियनच्या  मदतीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विजय साळवी असे आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तसेच त्याच्या नावावर चोरी आणि फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल  होते. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी दुपारी 12 च्या सुमारास विजय रमेश साळवी याने बनियानच्या सहाय्याने गळफास लावला. ही बाब तेथे उपस्थित असलेल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला उपचारासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यासंदर्भातील गुन्ह्याचा तपास  क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे.  मृत विजय साळवीवर भादंवि कलम 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल होता.  
याआधी काही दिवासांपूर्वी  अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीने ठाणे जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आशिष अनुप बरणवाल असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव होते.  28 जुलै रोजी मध्यरात्री त्याने जेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आरोपी आशिष बरणवाला वसईतील कामण डोंगरपाडा येथील रहिवासी होता.  सामूहिक बलात्कार आणि पोस्को अंतर्गत आशिषसह सहा जणांवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या वर्षभरापासून आशिष ठाणे जेलमध्ये शिक्षा भोगत होता.  

Web Title: Suicides by the accused in Andheri police station

टॅग्स :Crimeगुन्हा